विवेक शेगावकर/बुलढाणा
खामगाव : येथे बहुजन मुक्ती पार्टी जय मूलनिवासी यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी नेते भाई सिद्धू साळवे यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांचे सहकारी भाई राजेंद्र थेरोकार जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

सर्व पदाधिकारी आणि बहुजन मुक्ती पार्टी जय मूलनिवासी संघटनेच्या वतीने जबाबदारी देऊन भाई सिद्धू साळवे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि पुढील वाटचालीस आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे अशी संघटनात्मक ताकद तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही गोरगरीब जनतेला सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करताल असा विश्वास बहुजन मुक्ती पार्टी जय मूलनिवासी संघटनेने व्यक्त केला.

भाई सिद्धू साळवे यांनी पदभार स्वीकारला यावेळी सिद्धू भाई साळवे तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है असे नारे देण्यात आले. खामगाव तालुक्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

विवेक शेगांवकर/बुलढाणा
मो.न. 99231 35375