
श्री संस्थेव्दारे श्रींचा १४७ वा प्रगटदिन उत्सव दि. १३/०२/२०२५ ते दि.२०/०२/२०२५ पर्यंत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार संपन्न झाला. या उत्सवात दरारोज सकाळी ६.०० ते ६.४५ काकडा, ७.१५ ते ९.१५ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन,
सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० श्रीहरी कीर्तन संपन्न झाले.

सप्ताहात श्री ह.भ.प. अनंत बुवा कनवाडे, कळमुळा, श्री ह.भ.प. वासुदेव बुवा कोलंबीकर,
नायगांव बा., श्री ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते, सिरसोली, श्री ह.भ.प. अनंत बुवा बिडवे,
बार्शी, श्री ह.भ.प. राम बुवा डोंगरे, जाटनांदूर, श्री ह.भ.प. मयुर बुवा बोडखे, श्री क्षेत्र देहु, श्री ह.भ.प. श्रीहरी बुवा वैष्णव, जालना, श्री ह.भ.प. श्रीराम बुवा ठाकूर, लातूर आदी कीर्तनकारांचे कीर्तन संपन्न झाले.

श्री महारूद्र स्वाहाकार यागास माघ वद्य १ ला प्रारंभ होवून माघ वद्य ७ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. तसेच श्रींच्या प्रागट्टया’ निमित्य श्रीहरी कीर्तन होवून कार्यक्रम संपन्न झाला.


यावर्षी श्री प्रगटदिन उत्सवांत श्रींचे सेवेत १००१ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण १०९ नविन दिंड्यांना १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताक वितरीत करण्यात आल्या, जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्ती करीता नियमा प्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला.


तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन
प्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात
आली.

तसेच उत्सव काळात श्री शेगांवसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरीवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा प्रगटदिन उत्सव संपन्न होऊन २,३०,००० भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, अशा रितीने श्री कृपेने वारकऱ्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे. असे श्री संस्थान तर्फे कळविण्यात
आले.
