विवेक शेगांवकर / बुलढाणा
शेगाव : तालुक्यातील कालखेड येथील गटग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती दि.१९ फेब्रीवासी बुधवारी सकाळी ९ वाजता अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
शासनाने या वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा काढून साजरी करावी असे आदेश ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते.
त्यानुसार कालखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम गावातील जेष्ठ ग्रामस्थ अशोक पारखेडे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पुजन,दिपप्रजलन करुन माल्यार्पन करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा परीषद प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यासह गावातुन जय शिवाजी जय भारत च्या निनादात पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभुषा करुन आल्याने रॅलीला विशेष स्वरुप प्राप्त झाले होते.
या पदयात्रा कार्यक्रमाला सरपंच पवन बरिंगे, उपसरपंच पंडीत परघरमोर, एकात्मीक बाल विकास पर्यवेक्षीका सौ. उषा नेमाने, ग्रामअधिकारी सुषमा सावरकर यांची प्रमुख उपस्थीती होती.
तर पदयात्रेत अंगणवाडी सेविका भारती हेलोडे, शुध्दमती गणेश, मदतणीस सत्यभामा चोखंडे,ज्योती शेगोकार,सेंट्रल बॅक कॅशियर संजय हेलोडे, अरुन बुरुकले,ग्रा.पं. सदस्य भगवान हेलोडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थीती होती.
पदयात्रेची देखरेख व मार्गक्रमन सहाय्यक शिक्षक आशिष नाचने सर यांनी केले.पदयात्रे नंतर प्राथमीक शाळेत पार पडलेल्या सभेत शालेर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर व शौर्यावर आधारीत भाषने दिली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन आशिष नाचने सर यांनी तर आभार प्रदर्शन पंडीत परघरमोर उपसरपंच यांनी केले.