बुलढाणा प्रतिनिधी – विवेक शेगांवकर
शेगाव: स्थानिक श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले महाविद्यालयामध्ये शैक्षणिक, सामाजिक , बौद्धिक विकासाच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमाचे संस्था अध्यक्ष रामविजय बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते, त्या अनुषंगाने ,राजश्री शाहू सायन्स कॉलेज चांदुर रेल्वे ,जिल्हा अमरावती येथे “IMPACT 25″ आंतरराष्ट्रीय परिषदेचे ” दि. 27 मार्च 2025 ला आयोजित करण्यात आले होते.
या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रा. डॉ. कैलास रामकृष्ण मुळे यांनी, सहभागी होऊन देशातील व विदेशातील विज्ञान शाखेतील विविध तज्ञ यांच्यासमोर, शोधनिबंधचे सादरीकरण केले असता, अभ्यासपूर्ण संशोधन, प्रभावी संवाद कौशल्य, सादरीकरणातील नवनवीन दृष्टिकोनचा विचार करून डॉ.के आर मुळे यांना उत्कृष्ट सादरीकरणांसाठी बेस्ट प्रेझेंटेशन पुरस्कार व प्रथम पारितोषिक देण्यात आले.
या आंतरराष्ट्रीय परिषद मध्ये एकूण ६०० पेक्षा अधिक देश, विदेशातून शोधनिबंध सादर करण्यात आले, या आंतरराष्ट्रीय परिषदेला अध्यक्षया प्रा. उतारा जगताप , प्रमुख उपस्थिती आमदार सुलभा खोडके, शिक्षण उपसंचालक केशव तुपे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, विज्ञानअधिष्ठता डॉ.हेमंत देशमुख, प्राचार्य पराग वडनेकर व समन्वयक डॉक्टर एम पी चिखले ,गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. विद्या शर्मा मॅडम, डॉ, व्ही आर पाटील , प्राध्यापक द्यायगुडे सर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल त्यांना संस्थेचे अध्यक्ष रामविजय बुरुंगले व प्राचार्य डॉ . आर. ई .खडसान तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकइतर कर्मचाऱ्याकडून त्यांचे अभिनंदन केले.