शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली परीक्षा केंद्राची पाहणी

शेगांव येथील बुरुंगले महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला दिली भेट

बुलढाणा :  इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना शेगाव येथील श्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले कला व विज्ञान कनिष्ट महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला भेट देऊन परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भेटीच्या वेळी भारतीय संस्कृतीप्रमाणे प्राचार्या मीनाक्षीताई बुरूंगले व पर्यवेक्षक शिवाजी निळे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार केले. यावेळी आशिष वाघ उपशिक्षणाधिकारी(मा), अनिल देवकर, उपशिक्षणाधिकारी (प्रा),गटशिक्षणाधिकारी श्रद्धा वायदंडे, योगीराज फाउंडेशनचे सचिव डॉ. श्यामकुमार बुरूंगले, श्रीधर पाटील आणि सोबत इतर अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यादृष्टीने परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा राबविली जात आहे का याची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही भेट दिली.  

या पाहणी दरम्यान त्यांनी राज्यात आजपासून सुरू झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा व कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माहिती दिली. याशिवाय विद्यार्थ्यांनी शांततेत परीक्षा द्यावी. तसेच परीक्षा केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि पालकांनी कॉपीमुक्त अभियात सहभागी होवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!