जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप्स जर कोणते आहे तर आपण पटकन व्हॉट्सॲप बोलतोय आणि लोकप्रिय ॲपमध्ये व्हॉट्सअॅपचा समावेश होतो.
Meta च्या मालकीचे मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप लवकरच अँड्रॉइड यूजर्ससाठी आपल्या इंटरफेसच्या डिझाइनमध्ये बदल करणार आहे. व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स लाँच करत असतं.
असंच एक फीचर्स व्हाट्सअप ने आपल्या वापरकर्त्यांसाठी लॉन्च केलेले आहे ते म्हणजे व्हाट्सअप चैनल…
व्हाट्सअप चॅनल तयार करण्यासाठी व्हाट्सअप वर आपलं खातं असणं गरजेचे आहे.
व्हाट्सअप चॅनेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम व्हाट्सअप मध्ये आपल्याला ज्या ठिकाणी स्टेटस ऑप्शन दिसायचं त्या ठिकाणी अपडेट्स हे ऑप्शन दिसणार आहे.
अपडेट्स या ऑप्शनला सर्वप्रथम क्लिक करा अपडेट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्टेटस तसेच बरेच व्हाट्सअप चॅनेल्स अपडेट दिसतील.
आता तुम्हाला तुमचे व्हाट्सअप चॅनल तयार करायचे आहे करण्यासाठी तुम्हाला प्लस (+) चिन्ह त्या ठिकाणी दिसेल.
प्लस (+) चिन्हाला क्लिक केल्यानंतर क्रिएट चैनल आणि फाइंड चैनल हे दोन ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील.
नवीन व्हाट्सअप चॅनेल तयार करण्यासाठी क्रिएट चैनल हा पर्याय निवडा. आणि आपल्या व्हाट्सअप चॅनलला नाव द्या तसेच लोगो सेटअप करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या चैनल बद्दल माहिती भरा.
सर्व माहिती सेव केल्यानंतर तुमचे चैनल तयार होईल.
व्हाट्सअप चॅनेलचे फायदे असे आहे की, यामध्ये व्हिडिओ, फोटोज आपल्या फोनमधील स्टोरेज व्यापणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वापर कर्त्यांनी व्हाट्सअप गृपपेक्षा व्हाट्सअप चॅनलचा पर्याय निवडल्यास फोन हॅंग होण्याची समस्या उद्भवणार नाही.
अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा. 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029VaA8jpoAojZ0ZMLVdD2V