विवेक शेगांवकर, बुलढाणा
शेगाव : येथे आज रविवार ९ फेब्रुवारी रोजी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रियासह चष्मे वाटप व औषधी उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजून संपूर्ण देशामध्ये आरोग्य सेवेचे काम करत असतानाच शिवसेनेचे मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रियेसह चष्मे आणि औषध वाटप आरोग्य शिबिराचे आयोजन रविवार ९ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे करण्यात आले.

शेगाव येथील सईबाई मोटे उप जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी ९ वाजता या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कामगारमंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ गुलाबराव खरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, शिवसेना जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, प्रा. सचिन जाधव, महिला आघाडी प्रमुख शारदा पाटील तसेच जिल्हा प्रमुख शांताराम दाणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू मिरगे पाटील, तालुका प्रमुख रामा पाटील थारकर, उमेश पाटील अवचार, शहर प्रमुख संतोष लिप्ते उपस्थित होते.
या नेत्र तपासणी शिबिरातमोफत चष्मे, औषध वाटप आणि काचबिंदू, मोतीबिंदू आणि लेन्स संदर्भातील शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात आली आहे. सोबतच मोफत चष्मे आणि औषधीचे वाटप करण्यात आले. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.

या आरोग्य शिबिराचा लाभ गरजू रुग्णांनी लाभ घेतला . सईबाई मोटे जिल्हाउप रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी नाफडे आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू मिरगे, तालुका प्रमुख रामा थारकर, शहर प्रमुख संतोष लिप्ते तसेच युवा सेना महिला आघाडीच्या वतीने शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेण्यात आले. याप्रसंगी कालखेड ग्रामपंचायतचे सरपंच पवन बरिंगे यांनी आभार प्रदर्शन केले.