त्याचा दरारा असे सरकारी नोकरात बाबासाहेबांमुळे तुझ्या न माझ्या घरात…
अकोला: जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या एका छोट्याशा चतारी गावातील तरुण अजय सदार यांची MPSC ची परीक्षा पास झाल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
अजय सदार यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल चतारी गावकऱ्यांच्या वतीने अजयचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
अजय सदार यांच्या स्पर्धा परीक्षा पास होण्यात त्यांच्या आई वडिलांचा मोलाचा वाटा असल्याने अजयने स्वतःच्या नावापुढे आईचे नाव ‘अजय ज्योती सुभाष सदार’ असे लावून व आईवर कविता म्हणून सर्वांचेच मने जिंकून घेतले.
यावेळेस स्वतःच्या संघर्षाविषयी बोलतांना अजयने सांगीतले की, बारावी मध्ये क्लासेस लावू शकत नसल्यामुळे मी संपूर्ण पुस्तकेच पाठ केले होते, तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मी रात्रंदिवस अभ्यास करत होतो, जेंव्हा मी निराश व्हायचो तेंव्हा मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष आठवत होता आणि बाबा साहेबांपासून प्रेरित होऊन मी अधिक जोमाने अभ्यास करायचो.
आता मला इथेच थांबायचे नाही तर आणखी ही पुढे जाण्यासाठी UPSC ची परीक्षा पास होऊन मला IAS व्हायचे आहे आणि ते माझे स्वप्न आहे असे अजय सदार सांगीतले.
अजय सदार यांचा प्रा. संजय खडसे उपजिल्हाधिकारी सिंदखेड राजा, पोस्टे. चान्नी ठाणेदार रविंद्र लांडे, सुभाष वानखेडे, से.नि. बृहन्मुंबई वरिष्ठ अधिकारी, सुजित तेलगोटे पोलीस बॉइज संघटना जिल्हाध्यक्ष, शत्रुघ्न सदार, भारती न्यूज नेटवर्कचे संपादक विवेक शेगांवकर यांच्यासह ईतर मान्यवरांच्या आणि चतारी गावकऱ्यांच्या उपस्थितीत शाल, पुष्पगुच्छ, पुष्पहार घालुन भव्य नागरी सत्कार करण्यात आला.