बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव परिसरात एक व्यक्ती गजानन महाराजांचे रूप धारण करून संचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हुबेहूब गजानन महाराजांसारखी दिसणारी ही व्यक्ती कोण आहे ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आज ही व्यक्ती गजानन महाराजांच्या वेशात फिरत असताना काही युवकांनी या व्यक्तीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.. यावेळी ही व्यक्ती स्वतःला वाचवत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.. या व्यक्तीकडे लातूर जिल्ह्यातील घुग्गी येथील शेषराव रामराव बिराजदार नामक व्यक्तीचे बँक पासबुक देखील सापडले आहे.
मात्र अद्याप पोलिसांनी गजानन महाराजांच्या वेशात फिरणाऱ्या या व्यक्तीची साधी चौकशी देखील केलेली नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा एखाद्या मोठ्या अनुचित प्रकाराची वाट पाहत आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला ताब्यात घेऊन ती गजानन महराजांच्या वेशात का फिरत आहे. आणि आपण स्वतः गजानन महाराज असल्याचं का म्हणत आहे याचाही शोध घेतला पाहिजे.