फुलचंद भगत
वाशिम:-सध्याच्या इंटरनेट युगामध्ये जीवनातील दैनंदिन सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून होतात. त्यामुळे मोबाईल फोन हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनत चालला आहे. मात्र हाच मोबाईल फोन हरविल्यास किंवा चोरी झाल्यास मात्र आपली तारांबळ उडते. परंतु आपला हरविलेला/गहाळ झालेला मोबाईल शोधणे आता CEIR पोर्टलद्वारे सोपे झाले आहे.
केंद्र शासनाच्या CEIR वेबपोर्टलवर हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोयीचे झाले असून नागरिकांनी त्यांचा मोबाईल फोन हरविल्यास/चोरी झाल्यास तत्काळ www.ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार नोंदवावी. तसेच सायबर पोलीस स्टेशन येथे जाऊन आपल्या मोबाईलची तक्रार नोंदवावी. अशाचप्रकारे कारंजा उपविभागातील हरविलेले/गहाळ झालेले एकूण २४ मोबाईल CEIR पोर्टलद्वारे शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. कारंजा उपविभागातील पो.स्टे.कारंजा शहर हद्दीतील १५ मोबाईल संच, पो.स्टे.मानोरा हद्दीतील ०८ मोबाईल संच व पो.स्टे.कारंजा ग्रामीण हद्दीतील ०१ मोबाईल संच असे एकूण २५ मोबाईल संच (अं.किं.२,००,०००/-रुपयांचे) दि.०४.०९.२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कारंजा श्री.जगदीश पांडे यांचेहस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. तक्रारदारांना त्यांचे हरविलेले/गहाळ झालेले मोबाईल संच परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते व त्यांनी पोलीस विभागाचे आभार व्यक्त केले.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा श्री.जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.भूषण गावंडे, पोहेकॉ.गणेश जाधव, नापोकॉ.बालाजी महल्ले, पोकॉ.वैभव गाढवे, पोकॉ.सागर वाढोणकर यांनी पार पाडली. नागरिकांनी त्यांचा मोबाईल फोन हरविल्यास/चोरी गेल्यास CEIR पोर्टलवर तक्रार दाखल करावी व सायबर पोलीस स्टेशन, वाशिम येथे भेट द्यावी, असे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206