‘महाराष्ट गौरव पुरस्कारा’ने सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत सन्मानित
- रेल्वे याञी एकता मजदुर संघाव्दारा हाॅटेल रायझिंग सन’ अकोला येथे पार पडला सोहळा
वाशिम: वाशिम जिल्ह्य्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दि.१५ फेब्रुवारी रोजी अकोला येथील हाॅटेल रायझिंग सन येथे रेल्वे याञी एकता मजदुर संघव्दारा आयोजीत भव्य कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे, आमदार साजीद खान,यहोवा यिरे फाऊंडेशनचे डाॅ.रमेशकुमार बोरकुटे,नंदकुमार पांडे आदी मान्यवरांच्या ऊपस्थीतीत पञकार व सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ट्राफी, मेडल, सन्मानपञ आणी फेटा परिधान करुन ‘महाराष्ट गौरव पुरस्कारा’ने परिवारासह सन्मानित करण्यात आले आहे.
सामाजिक कार्याच्या माध्यमातुन गोरगरीबांची सेवा करीत असलेले व आपल्या लेखणीव्दारेही तळागाळातल्यांचा आवाज शासनदरबारी पोहचवुन सर्दैव न्याय देण्याची भुमिका जोपासत असलेले पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना रेल्वे याञी मजदुर संघ व्दारा आयोजीत केलेल्या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘महाराष्ट गौरव पुरस्कार’ दि.१५ फेब्रुवारी रोजी अकोला येथे प्रदान करण्यात आला आहे.
रेल्वे यात्री एकता मजदूर संघाच्या वतीने दि १५ फेब्रुवारी रोजी हॉटेल रायझिंग सन अकोला येथे स्नेहसंमेलन व महाराष्ट्र गौरव पुरस्कार चे आयोजन करण्यात आले होते,यावेळी अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे,आमदार साजीदखान पठान अकोला,यहोवा यिरे फाऊंडेशनचे रमेशकुमार बोरकुटे यांच्या हस्ते फुलचंद भगत यांना सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्र गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख ऊपस्थीती डॉ. सुनिल लहाने मनपा, आयुक्त, अकोला, संतोष कवडे स्टेशन प्रबंधक, अकोला, मिस अर्चना निमजे उपजिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला, मिस अर्चना गाडवे पोलिस निरिक्षक जीआरपी, अकोला,मिस सानिया सेलिब्रेटी, नागपूर) प्रा.डॉ. रमेशकुमार बोरकुटे सीईओ,यहोवा यिरे पाऊंडेशन) अॅड. हेमसिंग मोहता अकोला बार असोशिएशन अध्यक्ष शेख मुस्ताक (पोलिस निरिक्षक द.म.रे.अकोला हे होते. तसेच रेल यात्री एकता मजदूर संघचे संस्थापक अध्यक्ष नंदगोपाल पांडे,संस्थापक सचिव अंजनीकुमार पांडे,महाराष्ट अध्यक्ष एजाज अहमद व रेल्वे याञी एकता मजदुर संघाच्या पदाधिकार्यांची ऊपस्थीती होती.